Share

मी पक्षासाठी काम करत होतो तेव्हा आताचे नेते चड्डीत मुतत होते : एकनाथ खडसे

Published On: 

मुंबई : भाजप पक्षाने विधान परिषदेवर संधी दिल्याने नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांच्या विरोधात चांगलेच दंड थोपटले आहे. आपली नाराजी एकनाथ खडसे माध्यमांसमोर येऊन बोलून दाखवत आहेत. मला जाणून बुजून पक्षातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मी जेव्हा पक्षासाठी काम करत होतो तेव्हा पक्षातले काही जण चड्डीत मुतत होते, असा टोला खडसे यांनी लगावला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीमधील काही व्यक्ती मला जाणीवपूर्वक बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून अशा स्वरूपाचा छळ सुरू आहे. मात्र पक्षाच्या ध्येय धोरणांशी आणि निष्ठेशी प्रामाणिक राहिलो आहे.

पक्षामध्ये मी ज्यावेळी कामाला सुरूवात केली. आताचे नेते तेव्हा अर्धी चड्डी घालून, तर काहीजण चड्डीसुद्धा घालत नव्हते. काहीजण चड्डीत मुतायचे अशी स्थिती होती. आम्ही तेव्हापासून काम करत आहोत. अशा स्थितीत ज्या पक्षाशी आमची आपुलकी आहे. बांधिलकी आहे. त्यामुळे एकाएकी पक्ष सोडणं हे मला पटणार नव्हतं.

आजही हजारो कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहे की, कशासाठी पक्षामध्ये राहत आहात. लोकांची भावना बदलत चालली आहे, पण मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी हे सहन करत आलो आहे. पण, यालाही काही मर्यादा आहेत,” अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली.

महत्त्वाच्या बातम्या 

‘मोदी जी देशातील माध्यमांना हेडलाईन दिली, मात्र गरिबांना हेल्पलाईनची गरज’

आम्ही मेहनतीने पक्ष मोठा केला, आता पक्षाच्या समीकरणात आम्ही बसत नाही का ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!