Share

‘मोदी जी देशातील माध्यमांना हेडलाईन दिली, मात्र गरिबांना हेल्पलाईनची गरज’

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी 20 लाख करोडचं आर्थिक पॅॅकेज जाहीर करत देशात लॉकडाऊन वाढणार असल्याचे घोषित केले. यावरून कॉंग्रेसने पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत टीका केली. आपण माध्यमांना हेडलाईन दिली पण गरिबांना हेल्पलाईनची गरज आहे, हे कधी देणार ? असा सवाल विचारण्यात आला आहे,

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत हा सवाल केला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदीजी, तुम्ही तुमच्या भाषणातून देशातील मीडियाला वृत्त छापण्यासाठी ‘हेडलाइन’ तर दिली, पण देशाला अद्यापही मदतीच्या ‘हेल्पलाइन’ची गरज आहे….घरी परतणाऱ्या मजूर, कामगार, गरिब वर्गातील नागरिकांना सर्वात प्रथम मदत मिळणे गरजेचं आहे… तुम्ही त्याबाबत काही घोषणा कराल अशी अपेक्षा होती… पण, देश आणि राष्ट्रनिर्मित्तीसाठी कार्यरत असलेल्या मजूर व श्रमिकांप्रति आपल्या निष्ठुरता आणि असंवेदनशीलतेमुळे निराश आहोत…

देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करत असून, हा निधी देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या दहा टक्के आहे. त्याची बुधवारपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देतील, असे मोदींनी स्पष्ट केले. हे पॅकेज सत्यात उतरण्याची वाट पाहात आहोत, असेही सुरजेवाला म्हणाले. ट्विटरद्वारे सुरजेवाला यांनी ही टीका केली.

तसेच मोदींनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १८ मे पूर्वी हा लॉकडाऊन कसा असेल याची माहिती दिली जाईल अस मोदींनी सांगतिले. याआधी देशात ३ लॉकडाऊनचे टप्पे पार पडले. आता देश चौथ्या लॉकडाऊनमध्ये जाणार आहे. मात्र हा लॉकडाऊन काही भागात शिथिल असणार आहे, असेही मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

पोलिसांना वाली कोण ? सत्तेत असलेल्या शिवसेनेचा गृहमंत्र्यांना सल्ला

‘गेल्या सहा वर्षातील वेगवेगळ्या पोकळ घोषणांप्रमाणे आर्थिक पॅकेजची घोषणा पोकळ ठरू नये’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!