Share

आम्ही मेहनतीने पक्ष मोठा केला, आता पक्षाच्या समीकरणात आम्ही बसत नाही का ?

Published On: 

मुंबई : भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा झाली तशी पत्ता कट केलेल्या एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. तर आता खडसे यांनी भाजपच्या नव्या मांडणीच्या स्पष्टीकरणाचा चांगलाचं समाचार घेतला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना खडसे यांनी भाजपला चांगलेच लक्ष्य केले आहे.

ते म्हणाले की, नव्यानं मांडणी करत असताना प्रामाणिकपणे मांडणी करावी. हा पक्ष ज्यावेळी पाहत होतो, त्यावेळी आणिबाणीचा कालखंड होता. जनता पार्टीचा कालखंड होता. त्यानंतर स्वतः मी कार्यरत होतो. तेव्हा या पक्षाची ओळख जी होती, ती मारवाडी, ब्राह्मण अशा पक्षाची ओळख होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडे असतील, नितीन गडकरी असतील, मी असेल, भाऊसाहेब फुंडकर असतील, या सर्वांनी मिळून या पक्षाला बहुजनांचा चेहरा दिला.

तोपर्यंत बहुजनांचा चेहरा नव्हता. इथे कुणी यायला तयार नव्हतं. ओबीसींच्या संघटना तयार झाल्या. ओबीसींचे नेते तयार झाले. वर्षानुवर्षे ज्यांनी पक्षाला बळ दिलं. चेहरा बदलवला. तो चेहरा बदलवणं आता आम्हाला सांगता आहात का?,” असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

आम्ही जिवाचं रान करून आज हा पक्ष आज जो झालेला आहे, तो आमच्या ताकदीनं, मेहनतीनं आणि आमचा खारीचा वाटा होता म्हणून झालेला आहे. यांचं काय योगदान आहे पक्षामध्ये? कितीवेळा हे तुरूंगात गेले? कितीवेळा दगड खाल्ले? आम्ही सायकलवर फिरलो. हमालासारखं फिरलो. कित्येक वर्ष तुरूंगात काढली. त्या हालअपेष्टांना पक्षामध्ये काही किंमत आहे की नाही? यांच्या सामाजिक समीकरणामध्ये पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे बसत नव्हते का? असाही सवाल खडसे यांनी यावेळी विचारला.

दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे, चंद्रकांत बावनकुळे, पंकजा मुंडे यांची वर्णी लागेल असे म्हंटले जात होते. मात्र भाजपने ज्येष्ठांना घरी बसवून नवीन दमाच्या उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपने गोपीचंद पडळकर, रणजितसिंग मोहिते पाटील, प्रवीण दटके, अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

20 लाख कोटीमध्ये किती शून्य असतात हे अनुपम खेर यांनी दाखवून दिले

छ.संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी दारू विक्रीला संभाजी ब्रिगेडचा विरोध

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!