🕒 1 min read
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १८ मे पूर्वी हा लॉकडाऊन कसा असेल याची माहिती दिली जाईल अस मोदींनी सांगतिले. तर यावेळी मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा देखील केली. देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी हे पॅॅकेज असणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या आर्थिक पॅॅकेजच्या घोषणेनंतर ट्विटरवर एक मजेदार ट्रेंड सुरू झाला. या निर्णयाचे कौतुक करून लोकांनी एकमेकांना विचारण्यास सुरुवात केली की, सांगा २० लाख कोटींमध्ये किती शून्य आहेत? या ट्रेंडमध्ये बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरही पुढे आले. यावेळी त्यांनी २0 करोड ही किंमत अंकात लिहून दाखवली.
यावर अनुपम खेर म्हणाले की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा केवळ देशच नाही तर संपूर्ण जग ऐकतं आणि प्रेरणा घेते. १३० कोटी भारतीय आत्मनिर्भरतेची गुरुकिल्ली बाळगून वाटचाल करतील तर यश निश्चितच मिळेल. २०,००,००० कोटी असं दिसतात – 20000000000000! गणित बरोबर आहे ना? बहुधा! त्यांचे हे ट्विट काही मिनिटांत व्हायरल झाले.
जब भारत के प्रधानमंत्री @narendramodi बोलते हैं तो न केवल देश बल्कि पूरा विश्व सुनता है और प्रेरणा लेता है।130 करोड़ भारतीय आत्मनिर्भरता की कुंजी लेकर चलेंगे तो क़ामयाबी यक़ीनन हमारे क़दम चूमेगी।वैसे 20,00,000 करोड़ ऐसे दिखते है- 20000000000000! गणित ठीक है ना? शायद!????#जयहो ????????????
— Anupam Kher (@AnupamPKher) May 12, 2020
दरम्यान करोनाच्या संकटाचा सामना करताना जगाला चार महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला आहे. जगभरात पावणेतीन लाखांच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला. भारतातही अनेक कुटुंबीयांनी त्यांच्या माणसांना गमावलं आहे. एका व्हायरसने जगभरात थैमान घातलं आणि जगभरातल्या कोट्यवधी लोक संकटाचा सामना करत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
तसेच आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाल दिलासा देण्यासाठी घोषित २० लाख कोटींच्या विशषे आर्थिक योजने स्वावलंबी भारताला गती मिळेल, असेही मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊन विषयी व्यवस्थित कळवा, CM ठाकरेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
करोनाशी लढण्यासाठी नरेंद्र मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
