मुंबई : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. मात्र या साथीला पुन्हा डोके वर काढायला जराही वाव मिळू नये यासाठी देशव्यापी ‘लॉकडाउन’ येत्या ३ मेपर्यंत वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.
तसेच कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असताना देखील बऱ्याच ठिकाणी सरकारी आदेशाचे उल्लघंन केले जात आहे. यामुळे राज्यातील पोलीस प्रशासनाने आता सरकारी आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘आतापर्यंतचा अनुभव पाहता जनतेने सहकार्य करण्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी कामे नसतानाही लोक बाहेर पडतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडतो,’ असं भाजप नेते एकनाथ खडसे म्हणाले आहेत. असं वृत्त प्रभात’ वृत्तवाहिनीने दिलं आहे.
याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या सप्तसूत्री लॉकडाऊन सूचनेचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, त्यामुळे कोरोना पळवण्यासाठी आपल्याला यश येईल. नागरिकांनी सहकार्य करावे,’ असं मोलाचं आवाहन खडसे यांनी केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
