🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असून आता हि राजकीय कोंडी फोडण्यासाठी पडद्याआड हालचालींना वेग आला आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उडी घेतली आहे. ते बुधवारी शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, ‘शिवसेना आणि भाजप यांच्यात काय ठरंल होतं, ते उघड करावे, असे वक्तव्य,’ असे वक्तव्य खडसे यांनी यावेळी बोलताना केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘निवडणुकीपूर्वी जे ठरले आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये नक्की काय ठरलंय, ते सर्वांना कळायला हवे,’ असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात आज सत्ता स्थापनेच्या दृष्टीने काही निर्णायक घडामोडी घडणार आहेत. आज भाजपचे वरिष्ठ नेते राजभवनावर राज्यपालांच्या भेटील जाणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे १४ दिवसाच्या सत्ता संघर्षानंतर आज काही ठोस निर्णय होणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192296993588035585?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192293560692797445?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
