अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे ज्या प्रकारे व ज्या प्रमाणात नुकसान झाले ते पाहता पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १० हजार रुपये व फळ पिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये ही मदत अत्यल्प आहे. दिवाळी गोड होणे दूरच, वाया गेलेल्या पिकांचा उत्पादन खर्चही या मदतीतून भरून निघणार नाही. पंचनामे न करता घाईघाईने राज्य सरकारने हे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच जेष्ठ नेते एकनाथ खडसे हा विषय आता भाजपसाठी भूतकाळ झाला त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा असे म्हणत माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. राज्यात विधानसभा निवडणूक होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक भाजपने घेतली, त्यावेळी प्रा.शिंदे बोलत होते.
राम शिंदे पुढे म्हणाले की, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे खडसे हा आता भाजपसाठी भूतकाळ झाला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे नगर जिल्ह्याच्या भाजपला कोणताही फटका बसणार नसून येथे खडसे यांच्या प्रवेशाचा परिणाम शून्य आहे. खडसे यांच्या संपर्कात नगर जिल्ह्यातील कोणीही नाही, असा दावाही प्रा.शिंदे यांनी केला. तसेच कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यात यावेत. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन भाजप लवकरच जिल्हा प्रशासनाला देणार आहे, असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे विखे यांच्या विरोधात प्रा.शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील काही पराभूत उमेदवारांनी तक्रार केली होती. याबाबत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही जी तक्रार केली होती, ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ऐकून घेतली आहे. याबाबत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबतचा निर्णय प्रलंबित असून त्यावर आता काही बोलता येणार नाही. भाजपमध्ये जी शिस्त आहे, ती आम्ही पाळतो, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह खासदार डॉ.सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, प्रा.भानुदास बेरड, प्रसाद ढोकरीकर, सचिन पोटरे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- इतका पुळका आहे, तर भाजपने सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?
- ‘आम्ही फावड्याचे असे केले हाल,एक झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल!’
- ब्राह्मण समाजाच्या ‘या’ पावरफुल नेत्याने केला रिपब्लिकन पक्षात प्रवेश
- देवेंद्र फडणवीसांच्या नंतर आता अजित पवारांनाही झाला कोरोनाचा संसर्ग
- ‘उद्धवजी,तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे मालक असल्यासारखे का वागताय ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

