🕒 1 min read
मुंबई- काल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. दरम्यान, आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवलाय. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल असा इशारा देखील विरोधकांना काल ठाकरे यांनी दिला.
मुंबई, बिहार ते दिल्ली अशा सर्वच ठिकाणी उभ्या राहिलेल्या बाहुल्या, रावणी, काळी टोपी आणि बेडकी अशा सर्वांनाच त्यांनी अक्षरशः सोलून काढले.ठाकरे यांनी मुंबईची तुलना पाकिस्तानशी करणाऱ्या अभिनेत्री कंगणा राणावतवरही जोरदार टीका केली.मुंबई आणि महाराष्ट्रचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची, महाराष्ट्राची बदनामी कशाला करायची?, असं मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले होते.
मुख्यमंत्र्यांच्या टीकेला आता कंगनानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.’मुख्यमंत्री, तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी. लोकसेवक असताना तुम्ही क्षुल्लक गोष्टींवरून संघर्ष करत आहात. तुमच्याकडे असणारी सत्ता तुमच्याशी सहमत नसलेल्या इतरांचा अपमान करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी,’ अशा तिखट शब्दांत कंगनानं मुख्यमंत्री ठाकरेंवर पलटवार केला आहे.
Look at the audacity of a working CM he is dividing the country who has made him Maharashtra ka thekedaar? He is just a public servant there was someone else before him soon he will be out someone else will come to serve the state, why is he behaving like he owns Maharashtra?
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 26, 2020
कंगना एवढ्यावरच थांबली नाही, तिने अजून एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. ‘मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कुणी बनवलं? ते फक्त जनतेचे सेवक आहेत. त्यांच्यापूर्वी कुणी होतं, त्यांच्यानंतरही कुणीतरी त्यांची जागा घेईल. ते महाराष्ट्रात स्वत:च्या मालकीच्या असल्यासारखं का वागतात?’ असा प्रश्न कंगनाने विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी,कंगनाचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
- हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, ठाकरेंनी विरोधकांना दिले पुन्हा एकदा आव्हान
- तुम्ही काय‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का?; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- न्याय,हक्क मिळविण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारा – रामदास आठवले
- शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील संपूर्ण भाषण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
