Share

एकनाथ खडसेंना तिसऱ्यांदा कोरोनाची लागण ?

Published On: 

मुंबई : कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.

राष्ट्रावादी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रावादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खडसेंना याआधी दोनवेळा कोरोना सदृश्य लक्षणे आणि लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

त्यांनी ट्विटर च्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. ‘माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो’, असं एकनाथ खडसे यांनी ट्विट केले आहे.

एकनाथ खडसे यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज दुपारच्या सुमारास समोर आली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ खडसे यांना सर्वात आधी १९ नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल’, असं एकनाथ खडसे ट्विटरवर म्हणाले होते. त्यानंतर उपचार घेऊन ते बरे झाले होते.

त्यानंतर ३० डिसेंबर रोजी पुन्हा त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने डॉक्टरांनी त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. यावेळी त्यांनी प्रसिद्धीपत्रकही जारी केलं होतं. विशेष म्हणजे या कालावधीत त्यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांनी ईडीकडून तारीख वाढवण्याची मागणी केली होती. ती मागणी ईडीने मान्यही केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!