टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. अशातच भाजप आणि शिवसेना हे दोनही पक्ष मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच करत आहेत. त्यावर भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री पदावरून चाललेल्या गोंधळावर भाष्य करताना खडसे यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल ‘आमचं ठरलंय’ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात. पण नेमकं काय ठरलंय हे त्यांनी स्पष्टपणे सांगायला हवं. याबाबत स्पष्टता आल्यास कार्यकर्ते आणखी जोमाने काम करतील, असं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान, भाजप आणि शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री पदावर ठामपणे दावा करत आहेत. तसेच भाजप – सेनेचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयनेही मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
