मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका डिसेंबर २०१९ मध्ये सुरू झाली होती. या मालिकेने आता ५०० एपिसोड्स पूर्ण केले. कलाकार व टीमने हा सुवर्ण टप्पा व मालिकेला मिळालेले यश आनंदाने साजरे केले. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
मालिकेने हा टप्पा पार केल्यानंतर मालिकेच्या निर्मात्या एस बी फिल्म्सच्या डायरेक्टर स्मृती सुशीलकुमार शिंदे म्हणाल्या, “आम्हा सर्वांसाठी हा मोठा क्षण आहे. मालिकेने स्वत:चा दर्जा स्थापित करण्यासोबत प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली. ५०० एपिसोड्स पूर्ण करणे हा मोठा सुवर्ण टप्पा आहे. मी आमची क्रिएटिव्ह टीम, आमचे सर्व कलाकार व टीम आणि एण्ड टीव्ही टीमच्या अथक मेहनतीसाठी अभिनंदन करते.
पुढे त्या असंही म्हणाल्या, “आम्ही मालिका सुरू केली तेव्हा आमचा सर्वसमावेशक कथानकाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जीवनप्रवासाला सादर करण्याचा दृष्टीकोन होता. आज आम्हाला मालिकेने प्राप्त केलेल्या यशाचा अभिमान वाटतो. पण आम्ही प्रेक्षकांसमोर अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने बाबासाहेबांच्या शिकवणी व तत्त्वांना सादर करत राहू. या यशासाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन. मी आमच्यावर विश्वास दाखवण्यासाठी आणि आमचे यश साजरे करण्याकरिता हा क्षण देण्यासाठी चॅनेलचे खूप आभार मानते.”
भीमरावांची भूमिका साकारणारा अथर्व म्हणाला, “असे म्हणतात की यशाची पुष्टी म्हणून प्रत्येक सुवर्ण टप्प्याला साजरे केले पाहिजे. आज आम्हाला मालिकेने प्राप्त केलेल्या यशाचा अभिमान वाटतो. मालिका आणि तरूण भीमरावांची भूमिका माझ्या मनाच्या खूप जवळ असण्यासोबत माझ्यासाठी खूप खास आहे. डॉ. आंबेडकर यांची भूमिका साकारणे माझ्या करिअरमधील मोठी बाब आहे आणि त्यामुळे मला भरपूर प्रेम, आदर व मान्यता मिळाली आहे. तर, अभिनय क्षेत्रातला हा उत्तम अनुभव राहिला आहे.”
पुढे अथर्व म्हणाला, “त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारणे मोठी जबाबदारी आहे आणि माझा नेहमीच भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न असतो. आम्ही ५०० एपिसोड्सचा सुवर्ण टप्पा पूर्ण करत असताना मी सर्वांचे आभार मानतो. आम्ही आगामी दिवसांमध्ये असे अधिक यश गाठण्यासाठी प्रयत्न.” तर पाहात रहा ‘एक महानायक – डॉ. बी. आंबेडकर’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर असे अथर्वने सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
