🕒 1 min read
औरंगाबादः सिल्लोड तालुक्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त टिप्परला आयशरने पाठीमागून धडक दिल्याने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातात मरण पावलेले दोनही जण सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस येथील रहिवासी आहेत.
एम एच २० ईएल ७६३८ क्रमांकाचा आयशर पाचोरा येथून ऊसतोड कामगारांना घेऊन निघालेला होता. यावेळी सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळील नादुरुस्त टिप्पर आयशर चालकाला दिसला नाही. हा आयशर बारामतीकडे निघाला होता. धानोरा फाट्याजवळील रस्त्यावर येताच त्याने नादुरुस्त टिप्परला मागून धडक दिली.
या भीषण अपघातात कल्पनाबाई इमाजी पवार, प्रशांत विठ्ठल वाघ हे दोघे जागीच ठार झाले आहेत. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. यावेळी अपघात एवढा भीषण होता की आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी जमा झाले. दरम्यान जखमींना सिल्लोडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिलासा! ..तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार
- ‘उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीग्रस्तांना ५० हजार हेक्टरी मदत देऊन दाखवावी’, हरिभाऊ बागडेंचे आव्हान
- मोठी बातमी! हसन मुश्रीफ अहमदनगरचे पालकमंत्रिपद सोडणार
- ‘आयुक्त पांडेय यांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याच्या निर्णयास तत्काळ स्थगिती द्या’, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘निजामकालीन शाळांच्या विकासकामांची तत्काळ अंमलबजावणी करा’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश


