Share

फीसाठी तगादा लावणाऱ्या औरंगाबादेतील शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांचा दणका!

Published On: 

औरंगाबाद : खासगी प्राथमिक विनाअनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यित शाळांमध्ये आकारण्यात येत असलेल्या फी संदर्भात वारंवार तक्रारी येत आहेत. यावर फी न भरल्याने ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. यासह आदी नियमांचे पालन ज्या शाळा करणार नाहीत अशा शाळांवर कारवाई करू असे आदेश शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत.

अनेक शाळांनी फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले असल्याच्या अनेक तक्रारी पालक संघटनानी केल्या होत्या. आता शिक्षण विभागाने याची दखल घेतली असून नियमांचे पालन करावेच लागणार असल्याचे आदेश काढून सर्व खासगी प्राथमिक, विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित शाळांना नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच आदेशात शाळांना महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम २०११, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियमन २०१८ व महाराष्ट्र शैक्षणिक संस्था नियम २०१६ मधील तरतूदीनुसार शुल्क बंधनकारक असेल.

शाळेविरुद्ध फिस संदर्भात कोणतीही तक्रार आल्या तर शाळेची चौकशी करण्याचे सर्व अधिकार शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. तसेच चौकशीत दोषी आढळून आलेल्या शाळांविरुद्ध नियमानुसार  कारवाई करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल.  शाळा कोणत्याही विद्यार्थ्यांला फी न भरलेल्या ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहण्यापासून वंचित ठेवणार नाही. याशिवाय शाळा विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रविष्ट होण्यापासून थांबणार नाही.

याशिवाय फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवता नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे पालक नियमांचनुसार निर्धारित शाळेचे शुल्क भरणार नाही त्यांच्याविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याची मुभा शाळांना राहील. याशिवाय शाळांनी जर अधिनियमन व नियमातील तरतुदिनुसार शुल्क निर्धारित केलेली नसल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जमा केलेली रक्कम परत करावी लागणार. यासह आदी आदेश शिक्षण विभागाने काढले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!