Share

कोविडमुक्त गावांमध्ये शिक्षण विभाग राबवणार  ‘चला मुलांनो शाळेत चला’ विशेष मोहीम!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : दहावी-बारावीच्या वर्गाचे नियोजन पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या धड्यापासून करा जेवढा अभ्यासक्रम शिकवता येईल तेवढा शिकवा. पुन्हा कोरोना मुळे शाळा बंद झाल्या तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना दिल्या. मंगळवारी (दि.१३) माध्यमिक शिक्षण विभागाची सहविचार सभा ऑनलाइन पार पडली. यावेळी ते बोलत होते. ‘चला मुलांनो शाळेत चला’ अशी विशेष मोहीम या निमित्ताने राबवली जाणार आहे.

ज्या गावात एकही कोरोना रुग्ण नाही अशा ठिकाणी ग्रामपंचायतींना ठराव घेऊन शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. येत्या १५ जुलैपासून कोरोना मुक्त ४४६ गावातील ८५९ शाळा व महाविद्यालय सुरू होणार आहेत. त्या दृष्टीने माध्यमिक शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. कोरोनामुक्त ग्रामपंचायतीने त्यांचा अखत्यारीतील गावातील शाळेतील आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा, ग्रामपंचायत स्तरावर सरपंच अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे आदेश आहेत.

शाळा सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतीने ठराव दिलेला नाही तर शाळा सुरू होणार नाही. कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे कोविडमुक्त गावांनी पुढाकार घेऊन पालकांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव देणे गरजेचे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत तब्बल ६५० मुख्याध्यापक शिक्षकांची ऑनलाईन उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!