Share

Eknath Shinde : “संजय राऊतांना सत्तांतराची स्वप्न रंगवू द्या, पण सरकार…”; एकनाथ शिंदेंचा टोला

Published On: 

Sanjay Raut। मुंबई : काल शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानंतर पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती.

ते म्हणाले कि, काल राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली वारीवर येणार होते. स्वारीवर नाही.गेल्या महिन्याभरातली त्यांची ही ५वी दिल्ली भेट आहे, असा टोला राऊतांनी लगावला. तसेच यावेळी पुढे पत्रकार परिषदेत बोलताना राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन होऊ शकतं. पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे मोठे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तर यानंतर राऊतांच्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलाय.

एकनाथ शिंदे म्हणाले कि, ‘त्यांना स्वप्नात राहू द्या, ते स्वप्न पाहत असतात. त्यांना स्वप्न पाहू द्या. राज्यात 166 आमदारांचं सरकार आहे. लोकसभेतही 12 आमदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. राज्यात आणि केंद्रातही पक्षाकडे बहुमत आहे. सरकार पूर्णपणे मजबूत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या, असा जोरदार टोला शिंदेंनी राऊतांना लगावलाय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच ते आज माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची देखील भेट घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!