Share

विद्यार्थांच्या ईबीसीच्या समस्या जैसे थे ! १५०० विद्यार्थांना फटका

Published On: 

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालय प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे विद्यार्थांना ईबीसीच्या समस्यांना सामोरे जाव लागत आहे. १५०० पेक्षा जास्त विद्यार्थांना याचा फटका बसला आहे. याबाबत अभाविपने तंत्र शिक्षण संचालनालय पुणे यांना निवेदन दिले होते. मात्र काहीच निर्णय न झाल्याने अभाविपकडून आज आंदोलन कराण्यात आले.

शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये जेएसपीएम, सिंहगड इन्स्टिट्यूट येथे मागील महिन्यात विद्यार्थ्यांकडून ईबीसी अर्ज भरून घेतले. त्यांमध्ये अनेक विद्यार्थांचे अर्ज अपुऱ्या कागदपत्राभावी रद्द करण्यात आले. तर काही अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र त्यानंतर विद्यार्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता ईबीसी अर्ज रद्द करण्यात आले. याचा आर्थिक फटका सामान्य विद्यार्थांना बसला आहे.

प्रतिक्रिया 

“या विषयात लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ. तसेच संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करू व या सर्व विद्यार्थ्यांना ईबीसी मिळावी यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येईल.”

प्रा.गायकवाड सर,तंत्र शिक्षण संचालनालय पुणे

“ईबीसी ही गोर गरीब घरातील विद्यार्थ्यांकरिता शासनाने उपलब्ध करून दिलेली मदत आहे. आणि ही विद्यार्थ्यांना मिळावी कारण ही त्यांच्या हक्काची आहे. आम्ही आज आंदोलन हे प्राथमिक स्वरूपात केले आहे. शासनाला आम्ही त्वरित ईबीसी द्यावी, अशी मागणी केलेली असून मागणी मान्य न केल्यास आमच्या आंदोलनाची तीव्रता वाढेल. सोबतच या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची ईबीसी भेटावी यासाठी आम्ही शिक्षण मंत्र्यांना देखील भेटू.”
योगेश्वर पुरोहित, अभाविप मंत्री (गणेश खिंड भाग)

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!