🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: केळी (Banana) हे एक असे फळ आहे जे खाऊन प्रत्येकजण आपली भूक भागवू शकतो. त्याचबरोबर केळी हे आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असते. कारण केळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण हिवाळ्यात केळी खाऊ नका, असे आपण अनेकदा ऐकत असतो. पण असे नसून हिवाळ्यात केळी खाल्ल्याने आरोग्याला फायदे मिळू शकतात.
हिवाळ्यामध्ये केळी खाणे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर आहे का ?
केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम उपलब्ध असते. त्यामुळे केळी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये थंडीमुळे आपण पाणी कमी पीतो. अशा परिस्थितीत केळी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता देखील पूर्ण होते. त्याचबरोबर या फळांमध्ये उपलब्ध असलेल्या कॅलरीज शरीराला ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे केळीचे सेवन नेहमी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
हिवाळ्यामध्ये नियमित केळीचे सेवन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. कारण केळीमध्ये उपलब्ध असलेले पोटॅशियम शरीरातील रक्त प्रवाह सुधारते. परिणामी तुमच्या त्वचेला आणि सर्व पेशींना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषण मिळते. त्याचबरोबर त्वचेवरील चमक देखील वाढते.
महिला त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? दररोज एक केळी खाल्ल्याने तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. कारण दररोज सकाळी एक केळी खाल्ल्याने तुमची त्वचा आतून चमकायला लागू शकते. कारण केळीमध्ये असलेले पोटॅशियम त्वचेवरील कॅलरीजची पातळी वाढून त्वचा चमकदार बनवते.
केळीमध्ये पोटॅशियम सोबतच मॅग्नीज, मॅग्नेशियम, विटामिन सी इत्यादी घटक देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे नियमित केळीचे सेवन केल्याने त्वचा नैसर्गिक पद्धतीने मुलायम होण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर केळीमध्ये उपलब्ध असलेले विटामिन सी त्वचेच्या पेशींची काळजी घेण्यास मदत करू शकते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- NCP | शिंदे-फडणवीसांनी केलेल्या अगणित दिल्ली वाऱ्या पूर्णपणे निष्फळ ; राष्ट्रवादीची टीका
- Sanjay Pawar | “कोणाचा बाप आला, तरी आम्ही एक इंचही…”; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून शिवसेनेचा हल्लाबोल
- Suryakumar Yadav | ICC टी-20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव नंबर 1 वर कायम
- Nitesh Rane | दिशा सालियन प्रकरणी सीबीआयच्या अहवालांनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले,
- Sanjay Raut | “तोंडाची थुंकी का उडवत होता” ; दिशा सालियान प्रकरणावरून संजय राऊतांचा राणेंना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
