🕒 1 min read
Sanjay Pawar | कोल्हापूर : महाराष्ट्रासंदर्भात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ज्याची सर्वत्र चर्चा आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिंदे सरकारने समिती स्थापन केली आहे. मात्र, कर्नाटक सरकारने यावर आक्षेप घेतला आहे. आता कर्नाटकने नवा उपद्रव केला आहे. सीमाप्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगलीच्या जत तालुक्यावर दावा करण्याबाबत कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांनी भाजप आणि कर्नाटक सरकारवर हल्लाबोल केला आहे.
ते म्हणाले, “सीमा प्रश्न प्रलंबित असताना कर्नाटकचा महाराष्ट्रात नाक खुपसायचा काय संबंध? कोणाचा बाप आला तरी आम्ही एक इंच जमीन देणार नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आम्ही एक इंचही जागा देणार नाही. आमचं रक्त सांडलं तरी चालेल, तेथील लोक तयार होणार नाहीत.”
यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर देखील सडकून टीका केली आहे. “शिवरायांचा अपमान होत असताना भाजपची लोक काहीच बोलत नाहीत, महाराष्ट्र पेटून उठायला हवा होता. वास्तविक सीमाभागातील मराठी गाव आमची आहेत, त्यामुळे मुद्दा विचलित करण्याचा डाव कर्नाटक नाटक करून करत आहे”, असं पवार म्हणालेत.
पुढे ते म्हणतात, “महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठीला न्याय द्यायचा असता, छत्रपतींना न्याय द्यायचा असता, तर सर्वोच्च न्यायालयात जाऊन, यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपने हा प्रश्न सोडवला असता, पण त्यांना भिजत घोंगडं ठेवायचं हे भाजपचं कटकारस्थान आहे.”
रोहित पवार आक्रमक –
रोहित पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्री महाशयांची हिंमत आता थेट जत तालुक्यातील गावांवर दावा सांगण्यापर्यंत गेली आहे. एकीकडे सीमा भागाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना दुसरीकडे आपलं सरकार मात्र कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत शांत आहे,” असे रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Suryakumar Yadav | ICC टी-20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव नंबर 1 वर कायम
- Nitesh Rane | दिशा सालियन प्रकरणी सीबीआयच्या अहवालांनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले,
- Sanjay Raut | “तोंडाची थुंकी का उडवत होता” ; दिशा सालियान प्रकरणावरून संजय राऊतांचा राणेंना सवाल
- Thackeray – Shinde | भावना गवळी यांच्या समोरचं ठाकरे गटाची गद्दार…गद्दार…घोषणाबाजी
- Ajit Pawar | निवडणुका गुजरातमध्ये मग महाराष्ट्रातील कामगारांना सुट्टी का? ; अजित पवारांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

