Share

IPL 2022 : लॉटरी..! मॅक्क्युलमचा KKR संघाला अलविदा; मिळाली ‘बडी’ जबाबदारी!

Published On: 

मुंबई : न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि कोलकाता नाइट रायडर्सचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या शेवटी केकेआरला अलविदा करणार असल्याची दाट शक्यता आहे. मॅक्युलम इंग्लंड संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला असल्याचे वृत्त्त आहे. मॅक्युलम आणि केकेआरचे नाते फार पूर्वीचे आहे. आयपीएल २००८च्या सुरुवातीच्या सामन्यात मॅक्युलमने केकेआरसाठी १५८ धावांची इनिंग खेळली होती. त्याने कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सकडून क्रिकेट खेळले आहे. संघाच्या बैठकीदरम्यान मॅक्क्युलमने केकेआरपासून वेगळे झाल्याची माहिती दिली आहे.

BBC आणि इतर ब्रिटीश माध्यमांनी वृत्त दिले आहे, की न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज इंग्लंडचा कसोटी प्रशिक्षक होण्यासाठी आघाडीवर आहे. या आठवड्यात औपचारिक घोषणा होणार आहे. त्याचवेळी इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कोलकात्याच्या टीम मीटिंगमध्ये मॅक्युलमने याला दुजोरा दिला आहे.

इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेतील ०-४ अशा पराभवानंतर आपल्या पदावरून पायउतार झाले. इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड यांची काळजीवाहू प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी स्वतंत्र प्रशिक्षकांसाठी अर्ज मागवले होते.

ब्रेंडन मॅक्क्युलमने फेब्रुवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ख्राइस्टचर्चमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मॅक्युलमने आपल्या शेवटच्या सामन्यात १४५ आणि २५ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात त्याने अवघ्या ५४ चेंडूत शतक झळकावले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १०१ सामन्यात ६४५३ धावा आहेत. त्याने १२ शतके आणि ३१ अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ३०२ आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!