Share

IPL 2022 : रोहित विरुद्ध धोनी..! वानखेडेवर आज प्रेक्षकांचं होणार ‘पाणी पाणी’; सज्ज व्हा ‘एल क्लासिको’ मॅचसाठी!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात स्पर्धेचा ४९वा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात रोहित शर्माचा संघ स्वाभिमानासाठी खेळणार आहे. मुंबई इंडियन्स आधीच आयपीएल २०२२ मधून बाहेर गेला आहे. दुसरीकडे, सीएसकेचा संघही स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. केवळ काही आश्चर्यकारक चमत्कार एमएस धोनीच्या संघाला प्लेऑफमध्ये नेऊ शकतात. एकूणच आजच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये श्रेष्ठत्वाची लढाई होणार आहे.

आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सचा प्रवास खूपच निराशाजनक होता. चालू मोसमात रोहितचा संघ लयीत दिसला नाही. मुंबई इंडियन्सने १५व्या मोसमात ११ सामने खेळले आहेत. त्यापैकी २ जिंकले आहेत तर ९ गमावले आहेत. पॉइंट टेबलवर नजर टाकली तर मुंबई इंडियन्सचा संघ ४ गुणांसह तळाच्या १०व्या स्थानावर आहे.

दुसरीकडे सीएसकेची कामगिरीही चांगली झालेली नाही. चेन्नईने सुरुवातीला चारही सामने गमावले होते. नवा कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली सीएसकेने ८ सामने खेळले ज्यात २ जिंकले आणि ६ हरले. यानंतर जडेजाने संघाची कमान पुन्हा एमएस धोनीकडे सोपवली. तो कर्णधार झाल्यापासून चेन्नईने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. स्पर्धेत चेन्नईने ११ सामने खेळले आहेत ज्यात ७ पराभव पत्करले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!