औरंगाबाद : परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत रुजू होण्याचे आवाहन केलेले होते. जे कर्मचारी सोमवारपर्यंत रुजू होतील त्यांचे निलंबन करण्यात येणार नाही. असा दिलासा त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला होता. औरंगाबाद विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. बोटावर मोजण्याइतके कर्मचारी या २ दिवसात रुजू झाले आहेत. इतर कर्मचारी अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आज औरंगाबाद विभागातून ३९ बसेसच्या ५८ फेऱ्या झाल्या. तर ११८५ प्रवाशांनी प्रवास केला.
एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात महामंडळ कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप अद्यापही सुरूच आहे. मात्र दुसरीकडे संपात फूट पडल्याने आतापर्यंत औरंगाबाद विभागात ६१ कर्मचारी रुजू झालेले आहेत. सोमवारी (दि.१३) औरंगाबाद-पुणे मार्गावर चौदा खासगी शिवशाही चालवण्यात आल्या. आगार क्र १ सिडको येथून जालना मार्गावर बारा बसने बारा फेऱ्या करण्यात आल्या. यात ३७० प्रवाशांनी प्रवास केला.
औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर ३ बसने ३ फेऱ्या केल्या. औरंगाबाद-कन्नड मार्गावर २ बसने २ फेऱ्या केल्या. तर औरंगाबाद-नाशिक मार्गावर ३ शिवशाही बसच्या ३ फेऱ्या, कन्नड-औरंगाबाद मार्गावर ४ बसने ८ फेऱ्या केल्या. एकुण ३९ बसने ५८ फेऱ्या केल्या असून ११८५ प्रवाशांनी आज एसटीने प्रवास केला आहे. औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात यांत्रिकी विभागातील ३, १ वाहक रुजू झाला आहे. तर सिडको बस स्थानकात १ चालक, २ वाहक तर यांत्रिकी विभागाचे १ असे कर्मचारी आज रुजू झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुला काय झालं…’ म्हणत जान्हवीच्या हाताकडे पाहून नेटकऱ्यांनी केले कमेंट
- रवीना टंडनने शेअर केलेल्या व्हिडीओची रंगली चर्चा ; वाचा काय आहे प्रकरण
- धक्कादायक ! करीना कपूर आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह
- आम्हाला मुस्लिम आरक्षणाचे गिफ्ट द्या; आम्ही तुम्हाला निवडणूक न लढण्याचे रिटर्न गिफ्ट देऊ-खा. जलील
- अभ्यासाचा ताण असह्य झाला; ‘ती’ने अखेर मृत्यूला कवटाळले..!

