औरंंगाबाद : शहरातील विविध भागातून चोरांनी चार दुचाकी लांबविल्या. या घटना आठवडाभरात घडल्या. तुषार वसंतराव कुंटे (वय २७, रा. स्वस्तीकनगर, साजापूर) याने ४ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास घरासमोर दुचाकी (एमएच-२०-डीएक्स-९९५१) उभी केली होती. चोराने त्याची दुचाकी लांबवली.
तत्पुर्वी अजीम महेबुब शेख (वय ३९, रा. टीव्ही सेंटर, हडको) यांनी २ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास घरासमोर दुचाकी (एमएच-२६-एएन-८५२१) उभी केली होती. त्यांची दुचाकी चोराने मध्यरात्री लंपास केली. तर शेख साजीद शेख सलीम (वय २३, रा. बुढीलेन) या विद्याथ्र्याने ३० जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास घरासमोर दुचाकी (एमएच-२०-ईव्ही-९२८१) उभी केली होती. चोराने भरदिवसा त्याची दुचाकी लांबवली.
तसेच शेख एजाज शेख जैनोद्दीन (वय २७, रा. करमाड) हे नातेवाईकांना भेटण्यासाठी ३ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास जिल्ला हॉस्पीटल येथे आले होते. त्यावेळी त्यांनी झाडाखाली दुचाकी (एमएच-२०-एफसी-५६१२) उभी केली होती. चोराने त्यांची दुचाकी अवघ्या वीस मिनिटात लंपास केली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज – नाना पटोले
- ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा राणेंनी काय प्रतिक्रिया दिली होती ते आठवावं’
- राणेंची मंत्रिपदी वर्णी लागल्याने शिवसेना-भाजपच्या युतीची शक्यता अधिक धूसर ? फडणवीस म्हणाले…
- काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा, हिजबुलचा टॉप कमांडर ठार
- विरोधकांवर भारी ठरला दानवेंचा ‘चकवा’, रेल्वे राज्यमंत्री पदी मिळवली बढती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

