🕒 1 min read
मुंबई : अश्लिल व्हिडीओ प्रकरणात काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली. त्याच्या अटकेने बॉलिवूड हादरून गेले आहे. २० जुलै रोजी अटक झालेल्या राज कुंद्राला २३ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. यानंतर त्याला शुक्रवारी न्यायलयात पुन्हा हजर करण्यात आले. तेव्हा पुन्हा २७ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान याबाबत शिल्पा शेट्टीची देखील चौकशी करण्यात आली.
एक वृत्तानुसार शिल्पा शेट्टीचे पॉर्नाग्राफी प्रकरणात विधान नोंदवण्यात आले आहे. या चौकशीत तिने काही खुलासे केले आहेत. या प्रकरणात तिचा काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान शिल्पा म्हणाली की, ‘तिचा पती राज कुंद्राच्या हॉटशॉट या अॅपवर येणारे चित्रपट हे अश्लील चित्रपट नसून इरोटिक चित्रपट आहेत. राज कुंद्राचा अश्लील सिनेमाच्या निर्मितीशी माझा संबध नाही, असेही शिल्पा म्हणाली. तसेच यावेळी पोलीस चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टी राज कुंद्रावर चांगलीच चिडली असल्याचे समोर येत आहे.
शिल्पाची चौकशी करण्यासोबतच मुंबई गुन्हे शाखेने त्यांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त केले आहेत. सध्या या सगळ्या प्रकरणात शिल्पाचा सहभाग आहे का याचा तपास सुरु आहे. तसेच शिल्पानेही अश्लील चित्रपटांद्वारे पैसे कमावले आहेत की नाही याचा शोध पोलिस घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- भुवीच्या घातक गोलंदाजीमुळे भारताचा श्रीलंकेवर पहिल्या टी-२०त ३८ धावांनी विजय
- ‘सर्व ओटीटी वरील फिल्म्स आणि वेबसिरीज सेन्सॉर बोर्डाच्या नियमाखाली आणण्याबाबत विचार व्हावा’
- तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर ; केला कोकणचा दौरा
- ‘उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे! ते मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना आला, वादळं आली’
- काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना आपल्या परीने शक्य ती सर्व मदत करावी – पटोले

