🕒 1 min read
मुंबई – मुसळधार पाऊस, ढगफुटी, पूरस्थिती आणि दरडी कोसळून राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचे प्राण गेले असून हजारो लाखो लोक पुरामुळे बेघर झाले आहेत. राज्य सरकार बाधित लोकांना मदत करत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आपल्या परीने शक्य ती सर्व मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
पटोले पुढे म्हणाले की, ‘राज्यात मागील तीन चार दिवसापासून झालेल्या अतिवृष्टी व दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. पुराने थैमान घातले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. राज्यावर आलेली ही नैसर्गिक आपत्ती मोठी आहे. अतिवृष्टीने शेती, शेतमाल, जीवनावश्यक वस्तू, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त भागात मदत व बचाव कार्याची सध्या मोठी गरज आहे. अन्नधान्य, औषधं, कपडे, राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. जे लोक अडकून पडले आहेत त्यांच्या शोधकामातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा असे त्यांनी आवाहन केले आहे.
कोरोना संकटातही काँग्रेस कार्यकर्ते मदतीसाठी धावून गेले होते. संकट काळात जनतेच्या मदतीला धावून जाणे काँग्रेसची परंपरा आहे. राज्यावर मागील दीड दोन वर्षापासून संकटामागून संकट येत आहेत, आता पुन्हा नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटावरही आपण मात करू असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- भुवीच्या घातक गोलंदाजीमुळे भारताचा श्रीलंकेवर पहिल्या टी-२०त ३८ धावांनी विजय
- राज्यात आज १२३ रुग्णांचा मृत्यू कोरोनाबाधित ; वाचा आजची आकडेवारी
- तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर ; केला कोकणचा दौरा
- ‘उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे! ते मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना आला, वादळं आली’
- अन् अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहून खा. नवनीत राणांना अश्रू अनावर, पाहा हा व्हिडिओ..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
