मुंबई : गेल्या एक दिड वर्षापासून सुरु असलेल्य कोरोना प्रादुर्भावामुळे मनोरंजन सृष्टी पुर्णपणे ठप्प पडली होती. मात्र कालांतराने नियमाचे पालन करुन चित्रीकरणास सुरुवात होत आहे. अशातच अभिनेत्री नुसरत भारुचा संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘सोनु के टिटू की स्विटी’ मधुन प्रकाशझोतात आलेल्या नुसरत भारुचाने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये जम बसवला. याच चित्रपटाचे निर्माते लव रंजन यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ती काम करत आहे. मात्र या चित्रपटाच्या सेटवर ती चक्कर येऊन कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासुन तिची तब्येत बरी नव्हती. मात्र तरिही तिने कामाला प्राधान्या देत चित्रीकरण सुरुच ठेवले. गेल्या २०-२५ दिवसापासुन या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.
यादरम्यान अचानक तिची तब्येत बिघडली आणि ती सेटवरच कोसळली. यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला व्हर्टीगोचा अटॅक आला होता असे डॉक्टरांनी सांगितले. यासह नुसरत भारुचा अक्षय कुमारच्या ‘रामसेतु’ चित्रपटातही काम करत आहे. डॉक्टरानी तिला काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनावर मात करत युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम परतले मायदेशी
- धडाकेबाज अर्धशतक करणारा जडेजा पोहोचला ‘या’ दिग्गजांच्या यादीत पाचव्या स्थानी
- तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड ७० धावांची पीछाडीवर, टीम इंडिया पहिला डाव सर्वबाद २७८
- पुनावाला यांची मोठी घोषणा ; कोवोवॅक्स भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार लाँच, तर लहान मुलांची…
- नाशिकरांनो सावधान ! एकाच वेळी तब्बल ३० जणांना डेल्टा व्हेरियंटची लाग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

