Share

कोरोनाच्या प्रकोपामुळे निवडणुकांचा विचार सहा महिने टाळावा, बावनकुळेंची मागणी   

Published On: 

नागपूर : जिल्ह्यातील काही गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. काही राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाल्याचीही माहिती आहे. पण कोरोनाचा उद्रेक ग्रामीण भागातही प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अजून सहा महिने तरी निवडणूक घेऊ नये, अशी मागणी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे.

बावनकुळे म्हणाले, कोणत्याही निवडणुकीसाठी आम्ही २४ तास आणि ३६५ दिवस तयार आहो. पण ग्रामीण भागांत कोरोनाची स्थिती गंभीर झालेली आहे आणि या परिस्थितीत निवडणुका घेतल्यास संक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक टाळलेलीच बरी. निवडणूक आयोगाने जरी विचार केला असेल, तर तो सध्या थांबवावा आणि कोरोनाच्या संक्रमणात धोका पत्करू नये.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. प्रत्येक गावात आणि प्रत्येक मतदान केंद्रावर आमचे कार्यकर्ते तयार आहेत. पण कोरोनाचा प्रकोप अधिक वाढू नये, म्हणून निवडणुका सहा महिने टाळाव्या.

गेल्या निवडणुकीत भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळविले होते. यावेळी जरी राज्यात आमचे सरकार नाही, तरीही आम्ही अधिकाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवू. कारण राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर लोक नाराज आहेत. सोयाबीन, कापूस, धान सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. शेतकरी उद्ध्वस्त झाला. पण सरकारने काडीचीही मदत केली नाही.

राज्यभर कोरोनाचा उद्रेक झाला आहे आणि मुख्यमंत्री घरात बसले आहेत. रुग्णांना उपचार मिळत नाही, रुग्णालयांत बेड्स नाहीत, ऑक्सिजनअभावी रुग्ण मरत आहेत. त्यामुळे या सरकारवरून लोकांचा विश्‍वास उडाला असल्याचेही श्री बावनकुळे म्हणाले.

जनतेने गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारचे काम पाहिले आहे. तसेही महाविकास आघाडी सरकार हे लोकांच्या मनातील सरकार नाही. राजकीय स्वार्थापोटी धरूनबांधून तयार झालेले हे सरकार आहे. म्हणूनच कोरोनाच्या भयावह स्थितीत सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. प्रत्येक आघाडीवर महाविकास आघाडी अपयशी झाली आहे. त्यांना आता लोक उभेही करणार नाहीत.

त्यामुळे ग्रामपंचायतची निवडणूक त्यांनी या काळात घेतली तरी त्यांना यश मिळणार नाही. आम्ही कोणत्याही निवडणुकीची तयारी करत नाही, तर सदैव तयारच असतो. पण कोरोनाच्या स्थितीमुळे या निवडणुका सहा महिने लांबणीवर टाकाव्या, अशी सरकारला आणि निवडणूक आयोगाला विनंती असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!