Share

शिवरायांना अपशब्द: मनसेकडून छिंदमच्या पुतळ्याला फाशी

Published On: 

पुणे : अहमदनगर महापिकेतील भाजपचे निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान केला. त्यामुळे देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत.

पुण्यात मनसेकडून छिंदमच्या पुतळाल्या भर चौकात फाशी देण्यात आली. तसेच वंदे मातरम संघटनेकडून छिंदमच्या वाक्ताव्याचा निषेद करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी श्रीपाद छिंदम याचा पुतळा जाळुन निषेध करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदम हाअहमदनगर महापालिकेचे निलंबित उपमहापौर आहे. छिंदमने त्याच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!