🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले. दरम्यान, वानखेडेंसह त्यांच्या परिवारावरही आता टीका होत आहे. त्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांवर निशाना साधला आहे.
काय जमाना आहे..
आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं
तर
जीव धोक्यात घालणा-या समीर वानखेडे व त्यांची पत्नी @KrantiRedkar वर अभद्र भाषेत टिका सुरू आहेजेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं
क्रांती,महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 23, 2021
चित्रा वाघ म्हणतात, ‘काय जमाना आहे. आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे व त्यांची पत्नी क्रांती रेडकर वर अभद्र भाषेत टिका सुरू आहे. जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं. क्रांती, महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे.’ असे चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे.
राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच ‘तुला तुरुंगात टाकल्याशिवाय शांत राहणार नाही’, असे वक्तव्य देखील मलिक यांनी केले होते. यावरून सध्या एकच खळबळ उडाली आहे.
- आरएसएस विरोधात वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
- मुख्यमंत्री ठाकरे औरंगाबादेत दाखल, उच्च न्यायालय खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे करणार उद्घाटन
- धुळ्यात बॅनरवरील फोटोचा वाद; रोहित पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात झटपट
- २०२० मध्ये पाठवली नोटिस; अन २०२१ मध्ये पाडले दिवाण देवडीतील ते ‘अनधिकृत’ बांधकाम!
- सोशल लाल किल्ल्यावरील तो भव्य, तेजस्वी तिरंगा सुरक्षित आहे का?; शिवसेनेचा संतप्त सवाल


