🕒 1 min read
भोपाळ : भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्यात. यावेळी त्यांनी मशिदीतील पहाटेच्या ‘अजान’ला आक्षेप घेतला आहे. अजानचा लोकांच्या साधना आणि पूजेवर परिणाम होतो. तसेच रुग्ण आणि इतरांना त्रास होत असल्याचे त्या म्हणाल्या. भोपाळच्या बैरसिया भागात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात खासदार प्रज्ञा सिंह बोलत होत्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘सकाळी ५.०० वाजल्यापासून हे आवाज येणं सुरू होते. सगळ्यांनी झोपमोड होते. रुग्णांचा त्रास वाढतो. साधूसंन्याशीही सकाळी ४.०० ते ५.०० वाजता ध्यानसाधना करतात. परंतु, याची कुणालाही पर्वा नाही. जबरदस्तीनं लोक माईक लावतात’, असं म्हणत प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीम धर्मातील ‘अजान’ हा शब्द न उच्चारता टीका केली.
यावेळी, ‘जगात कोणताही धर्म नाही केवळ सनातन धर्म आहे’ तसंच ‘आम्ही सर्वधर्म सद्भावाची भावना मानतो’ अशी वक्तव्यंही त्यांनी उपस्थितांसमोर केली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी १३० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे खासदार म्हणून त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा लक्षात ठेवावी, अशी प्रतिक्रिया आमदार आरिफ मसूद यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या या टीकेवर दिली आहे. तसेच एका धर्माचा आवाज दुसऱ्या धर्माला कधीच दुखावत नाही, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रात पाव किलो ड्रग्ज शोधणाऱ्यांनी गुजरातमधल्या…’, एनसीबीवर राऊतांचा हल्लाबोल
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून नवाब मलिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप!
- भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सगळे कपडे स्वच्छ होतात-संजय राऊत
- एसटी कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? भाजपचा सवाल
- ‘होय, आम्ही कामगारांच्या पगाराची जबाबदारी स्वीकारतो, तुम्ही राजीनामा देणार का?’


