Share

दक्षिण अफ्रिका-वेस्ट इंडिज कसोटी; दुसऱ्या डावात इंडिज 4 बाद 82, तीन दिवसाचा खेळ शिल्लक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेस्ट इंडिज येथील सेंट लुशीया मैदानावर सुरु असलेली वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका संघातील कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर वेस्ट इंडिजने 4 गडी गमावत 82 धावांची मजल मारली आहे. वेस्ट इंडिजचा संघ अद्यापही 143 धावांनी पीछाडीवर आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकुन पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय दक्षिण अफ्रिकेने चुकीचा ठरवला. दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजची दाणादाण उडाली. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संपुर्ण संघ अवघ्या 97 धावांत आटोपला. माजी कर्णधार जेसन होल्डरने वेस्ट इंडिजकडुन सर्वाधीक 20 धावांची खेळी साकारली. 5 फलंदाज वगळता इंडिजचे इतर फलंदाज हे दुहेरी धावसंख्या ओलांडु शकले नाही. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 322 धावा केल्या. क्विटंन डिकॉकने दक्षिण अफ्रिकेकडुन सर्वाधीक 141 धावांची शतकी खेळी साकारली. एडिन मार्करमने 60 धावांची अर्धशतकी खेळी करत त्याला साथ दिली.

दुसऱ्या दिवसाअखेर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात सावध फंलदाजी करताना 4 गडी गमावत 82 धावांची मजल मारली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रॉस्टन चेज 21 आणि जर्मैन ब्लॅकवुड 10 धावांवर खेळत होते. वेस्ट इंडिजचा संघ अजुनही 143 धावांनी पीछाडीवर आहे. तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज कसा खेळ करते यावर सामन्याचा निकाल अवलंबुन आहे. तीन दिवसाचा खेळ शिल्लक असल्याने सामन्याचा निकाल लागणार याची उत्सुकता क्रिकेट रसिकांना लागली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!