Share

डॉ. सुधीर रसाळ यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर

Published On: 

औरंगाबाद : स्वातंत्र्यसैनिक व निर्भीड पत्रकार अनंत भालेराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर झाला आहे. येत्या 17 नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ. सविता पानट यांनी दिली.

पत्रकारिता, साहित्य, कला, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील एका नामवंत व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांना देण्यात आला होता. वर्ष 2019 च्या पुरस्कारासाठी मराठी साहित्य, समीक्षा आणि भाषा या क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल डॉ. सुधीर रसाळ यांची निवड करण्यात आली. 50 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. रसाळ हे मराठी भाषा व वाङ्मयाचे नामवंत शिक्षक, पत्रकारितेचे जाणकार म्हणून ओळखले जातात. अनंत भालेराव आणि मराठवाडा यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. रसाळ यांनी साक्षेपी समीक्षक, मर्मग्राही विश्लेषक संवेदनशील सौंदर्यासक्त रसिक आणि शिस्तप्रिय अभ्यासक अशी स्वत:ची प्रतिमा साहित्य क्षेत्रात निर्माण केली आहे. समीक्षेच्या क्षेत्रातील रसाळ हे एक महत्त्वाचे नाव समजले जाते. त्यांची समीक्षेवरची 10 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा कविता आणि प्रतिमा’ हा ग्रंथ या क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. रसाळ यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार मिळालेले आहेत. आजही त्यांचे समीक्षा, संशोधनपर लेखन सुरू असून विंदा करंदीकर यांच्या कवितेची समीक्षा करणारा ग्रंथ लवकरच प्रकाशित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182227752553865217?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182227579635302400?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!