Share

डॉ. झाकिर नाईकला भारतात आणण्यात येणार असल्याचं वृत्त निराधार?

Published On: 

नवी दिल्ली : वादग्रस्त ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चा संस्थापक डॉ. झाकिर नाईकला मलेशियात अटक करण्यात आली असून,आज त्याला भारतात आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मलेशियाच्या पोलिसांनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी नाईकने मात्र अटक झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

दहशतवाद्यांना निधी पुरवत असल्याचा आणि चिथावणीखोर भाषणे करत असल्याचा आरोप असलेल्या नाईकविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व सक्तवसुली संचालनालयाने (इडी) अनेक एफआयआर नोंदवले आहेत. त्यामुळे तो मलेशियात लपून बसला होता. पीस टीव्हीवरील नाईकच्या भाषणामुळे ढाकामध्ये २०१६ मध्ये हल्ला झाला होता, असा दावा बांगलादेशाने केला होता.

या हल्ल्यात एका भारतीय तरुणीसह साधारण २२ लोक ठार झाले होते. चिथावणीखोर भाषण देणाऱ्या नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला २०१६ मध्ये बेकायदा घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे नाईकच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळेच तो मलेशियात पळाला होता,दरम्यान, त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी पूर्ण झाली असून, आज त्याला भारतात आणण्यात येणार असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, नाईकने अटक झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. मला अटक झाली असून आज मला भारतात आणण्यात येणार असल्याचं वृत्त निराधार आहे. जोपर्यंत मला सुरक्षित वाटत नाही. तोपर्यंत भारतात येण्याचा माझा कोणताही इरादा नाही. निष्पक्ष सरकार आल्यावरच मी माझ्या मायदेशी परतेल, असं नाईकने म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!