🕒 1 min read
मुंबई : कोल्हापूर येथील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, गेली सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे नेतृत्व करणारे लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील (Dr. N.D. Patil) (वय ९३) यांचे आज (१७ जाने.) निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकऱ्यांशी बांधिलकी जपणारा नेता हरपला, अशी प्रतिक्रिया शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करत दिली आहे.
शरद पवार ट्विट करत म्हणाले, डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले.’ असे शरद पवार म्हणाले.
डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले. pic.twitter.com/HJy9s1TWgT
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 17, 2022
प्रकृती अस्वास्थामुळे ११ जानेवारीपासून कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालपासून त्यांची प्रकृती गंभीर बनली. आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉ.अशोक भूपाळी यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी वयाच्या (93) व्या वर्षाही त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.
महत्वाच्या बातम्या
-
“भाजप राजकीय फायद्यासाठी जातीय चौकटीत बांधू पाहतेय”, संजय राऊतांची टीका
-
“भाजप पुढाऱ्यांना दलितांच्या घरी जेवल्याचा बोभाटा करावा लागतो, याचाच अर्थ त्यांच्या मनात ‘जात’ आहे”
-
जितेंद्र आव्हाडांनी घेतली किरण मानेंची बाजू म्हणाले, “वागणुकीमुळे नाही तर…”
-
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’; रवी राणांचा शिवसेनेवर हल्ला
-
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
