🕒 1 min read
औरंगाबाद : कन्नड तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. लांजेवार यांचा तत्काळ पदभार काढून हतनुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. हेमंत गावंडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांनी कन्नड येथील दिलेल्या भेटी दरम्यान सांगितले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्या कारभारावर देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करुन कारवाईची शिफारस करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांनी कन्नड येथील वाढलेल्या तक्रारींची शहनिशा करण्यासाठी शुक्रवारी भेट दिली. यावेळी येथील आरोग्य यंत्रणेतील असमन्वय आणि कामातील हलगर्जीपणा समोर आला आहे. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणेतील समन्वय आणि काम सुरळीत चालते आहे का ? यासंबंधी अचानक शुक्रवारी डाॅ. गोंदावले यांनी कन्नड येथे भेट दिली.
तालुका आरोग्य अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यात दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न करणे, एसओपी प्रमाणे काम न केल्याचे उघड झाले आहे. गरज नसताना १५ डिसीएचसीला रुग्ण संदर्भित करणे, कोरोना बाधितांना थेट घाटीत पाठवण्याचे प्रकार कागदपत्रांच्या तपासणीअंती समोर आले आहेत. तर तालुका आरोग्य अधिकारी यांनी पाठवलेले रुग्ण भरती करुन न घेणे, गेल्या वर्षी दिलेल्या १० व्हेंटीलेटर पैकी ८ व्हेंटीलेटर जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. उरलेले दोन व्हेंटीलेटर अद्याप देखील सुरु केलेले नाही. त्यासंबंधी वैद्यकीय अधिक्षकांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत यासंबंधी वैद्यकीय अधिक्षकांच्या चुकीच्या कारभाराचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांनी या वेळी बोलतांना सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- परमबीर सिंह हे भाजपचे डार्लिंग झाले आहेत; राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका
- पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी…
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ‘प्रिय EC, माजरा क्या है ?’ भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
