औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गाजत असलेल्या विषयांपैकी डॉ. गीता पाटील आणि डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या प्रकरणाचे अवलोकन करण्यासाठी व्यवस्थापन -परिषदेची तातडीची बैठक मंगळवारी ऑफलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे.
विद्यापीठातील डॉ. प्रशांत अमृतकर यांना संशोधक विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून निलंबित करून गाईडशिप काढून घेण्यात आली होती. शिवाय त्यांना निलंबित करत अधिष्ठातापदावरून हटविण्यात आले होते. या प्रकरणी त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. दुसरे प्रकरण डॉ. गीता पाटील यांच्याबाबतीत संशोधक विद्यार्थी, विविध संघटना आणि विभागातील अध्यापक यांनी दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या आदेशानुसार ही बैठक प्रशासकीय इमारतीमधील व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात दुपारी ३.०० वाजता ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस उपस्थित राहावे, असे पत्र कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी व्यवस्थापन परिषद सदस्यांना पाठविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा
- अभिनेता परेश रावल ‘omg 2’ चित्रपटात दिसणार नाही.., कोण साकारणार ‘ही’ भूमिका?
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट
- ‘शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सरकार करत आहे’
- सोमय्यांना मोठा दिलासा; मानहानीच्या खटल्यात अखेर जामीन मंजू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

