Share

‘बेरड’ कार डॉ. भीमराव गस्ती यांचे निधन

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचे मंगळवारी पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बेळगावमधील यमुनापूर या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ. गस्ती यांनी देवदासी प्रथा नष्ट व्हावी, यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. देवदासी महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी ‘उत्थान’ ही सामाजिक संस्था त्यांनी बेळगावमधील यमुनापूर येथे सुरू केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये त्यांनी मोठं काम केलं आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते. डॉ. गस्ती यांनी गावातील शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं. एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयात त्यांनी पीएचडी मिळवली होती. डॉ. गस्ती यांनी सामाजिक कार्यासह लेखनही केलं. बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि छळाचं चित्रण त्यांनी ‘बेरड’ या आत्मचरित्रातून मांडलं. या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. आक्रोश आणि सांजवारा ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!