हिंगोली : काही वर्षापुर्वी एक चित्रपट आला होता. ज्यात २१ दिवसात पैसे डबल करण्याचे अमिष दाखवून लुटल्याचे दाखवले जाते. ‘२५ दिन मे पैसा डबल’ हा सवांद आजही प्रसिद्ध आहे. या चित्रपटाची कथा वाटावी अशी घटना वसमत तालुक्यात घडली. येथे एका तरुणास एक महिन्यात पैसे दामदुप्पट करुन देण्याचे अमिष दाखवून ५ लाखांना फसवले आहे.
वसमत तालुक्यातील चोंढी बहिरोबा येथील संतोष जाधव हे राहतात. ते एका कीटकनाशक कंपनीमध्ये सेल्समन म्हणून कार्यरत आहेत. त्यातून त्यांची सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथील ज्ञानेश्वर नारायण जाधव याच्यांसोबत ओळख झाली. काही भेटीनंतर ज्ञानेश्वरने संतोष जाधव यांना एक महिन्यात पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले.
या अमिषाला बळी पडून संतोष जाधव यांनी २ लाख रुपये दिले. त्यानंतर ज्ञानेश्वरने २९ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे येण्याचे सांगितले. त्यानुसार संतोष जाधव ३ लाख रुपये घेऊन औरंगाबाद येथे गेला असता तेथील जटवाडा रोड भागात ज्ञानेश्वर जाधव व इतर तिघांनी त्यास मारहाण केली. त्यानंतर त्याच्या जवळील ३ लाख रुपये हिसकावून घेतले. फसवणूक करणाऱ्या चौघांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये औरंगाबाद येथील तीन तर सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथील एकाचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा !
- ‘आत्मनिर्भरता’ शब्द ठरला वर्षातील शब्द ! ‘ऑक्सफर्ड’कडून जाहीर !
- ‘न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा देखील तिरंग्याचा अपमानच’ – सामना अग्रलेख
- सोशल मीडियालाही आता आणणार कायद्याच्या कक्षेत
- तहसीलदार – नायब तहसीलदार संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
