नवी दिल्ली : दरवर्षी ऑक्सफर्ड भाषा विभागाकडून वर्षातील शब्द जाहीर केला जातो. यामध्ये २०१७ पर्यंत फक्त इंग्रजी शब्दांचा समवेश आशयाचा मात्र आंत हिंदी शब्द देखील जाहीर करण्यात येतो. हा शब्द निवडताना सर्वसमावेशक आणि सकारात्मक उर्जा देणारा शब्द निवडण्यावर ऑक्सफर्ड चा भर असतो.
२०१७ पहिल्यांदा हिंदी शब्द म्हणून ‘आधार’ म्हणून निवड केली गेली होती. यामध्ये प्रथमच ‘आधार’ या शब्दाने बाजी मारली होती. तर यावर्षी हा मान ‘आत्मनिर्भरता’ या शब्दाला मिळाला आहे. ऑक्सफर्डच्या म्हणण्यानुसार, या हिंदी शब्दात संपूर्ण वर्षांतील भावना व इतर सर्व गोष्टी व्यक्त झाल्या आहेत, त्यामुळे २०२० मधील महत्त्वाचा हिंदी शब्द म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे.
कोरोनामधून अर्थव्यवस्था व जनतेला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. यावेळी त्यांनी देशाला संबोधित करताना ‘आत्मनिर्भर भारत’ असे या योजानेला नाव देत देशवासियांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सामान्य लोकांच्या तोंडीही हा शब्द आला.
या शब्दाची निवड भाषा तज्ज्ञ कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय व इमोगेन फॉक्सेल यांनी केली आहे.अग्रवाल यांनी सांगितले की, लोकप्रिय शब्दासाठी अनेक प्रवेशिका आल्या होत्या त्यातून आत्मनिर्भरता या शब्दाची निवड केली आहे. कारण दैनंदिन जीवनात हा शब्द अनेक भारतीयांनी वापरला. या शब्दाने आबालवृद्धांना सामर्थ्य दिले.
महत्वाच्या बातम्या
- ‘न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा देखील तिरंग्याचा अपमानच’ – सामना अग्रलेख
- कोणतीही पुर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडीत; महवितरणने ची कारवाई
- अनुकंपा नियुक्तीतील प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
- मुंबईची नाईट लाईफ राहूदे मागे जरा, आधी लोकल सुरळीत चालू करा !
- जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेवरील अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
