🕒 1 min read
कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वाद चांगलाच चिघळत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सोमय्या यांनी मुश्रीफ तसेच त्यांच्या कुटुंबियांवर कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमय्या कोल्हापूरला जात असताना त्यांना पोलिसांकडून रोखण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी २८ सप्टें.ला कोल्हापूरला जाण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, त्यावेळी सोमय्या यांनी कोल्हापूरला येऊ द्या. त्यांची कुठल्याही प्रकारे अडवणूक करु नका, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
यासंदर्भात आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करत मुश्रीफ म्हणाले की,’किरीट सोमय्या यांनी दोन कारखान्यांबाबत माझ्यावर आरोप केले होते. कोल्हापुरात कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण झाल्यामुळे सोमय्यांना मागच्यावेळी प्रतिबंध केला होता. मंगळवारी ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यांना कुणीही अडथळा निर्माण करु नका, त्यांना येऊ द्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कुठलीही कृती करु नका. त्या दिवशी ऐकू वाटलं नाही तर टीव्ही बंद करा, शेतात जा. ते कुठे जातील, काय बोलतील ते त्यांना बोलू द्या.’ असे ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’सोमय्या यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी आपला दौरा संयमाने करावा. कुठल्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य करु नये. त्यांनी आमच्या कामाची माहिती घ्यावी. मी त्यांना वारंवार सूचना केली होती की जिल्ह्यात आमचे राजकीय, सामाजिक, सहकारात असलेल्या कामाची त्यांनी माहिती घ्यावी.’ असेही मुश्रीफ म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- ‘राज्यात काय चाललयं याचा थांगपत्ता नाही’; आरोह वेलणकरचा मविआ सरकारवर निशाणा
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- ओशो आश्रमातील गैरकारभाराची सरकारने चौकशी करावी; ओशो अनुयायांची आठवलेंकडे मागणी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
