🕒 1 min read
अबुधाबी : आयपीएलच्या यशस्वी समाप्तीनंतर, यूएई आणि ओमानमध्ये टी 20 विश्वचषक 2021 रविवार, 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. 24 ऑक्टोबर रोजी दुबईत खेळल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत, विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला आगरकरने टीम इंडियाला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.
या सामन्या पूर्वी आगरकरने टीम इंडियाला एक सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, ”भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघावर दबाव असतो. सध्याचा भारतीय संघ पाहता पाकिस्तानचं आव्हान मोठं नसलं तरी त्यांना हलक्यात घेण्याची चूक भारताने करु नये. असा सल्ला त्याने दिला आहे. हा टी20 सामना असल्याने परिस्थिती कधीही बदलू शकते.’ त्यामुळे, दोन्ही संघाचा सध्याचा फॉर्म पाहता भारतासाठी पाकिस्तानचं आव्हान जास्त मोठं नसलं तरी भारताला पाकिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही.
टी20 वर्ल्ड कपच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
