Share

कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री ? असा सवाल केला आहे चंद्रकात पाटील यांनी. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत पण तेच मुख्यमंत्री असल्यासारखं वागत आहेत अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी ही फसवी आहे अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. त्याचविरोधात भाजपाने कोल्हापुरात मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली.

चंद्रकांत पाटील यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावरही भाष्य केलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला कुणी अडवलं आहे? आम्ही स्वच्छ आहोत. जी काही चौकशी करायची आहे ती लवकर करा. भीमा कोरेगाव प्रकरणात केंद्राच्या समितीला सहकार्य केलं नाही तर त्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात भाजपने आज कोल्हापुरात मोर्चा काढला होता.या मोर्चात माजी खासदार धनंजय महाडिक, भाजप प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, बाबा देसाई, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे आदी सहभागी झाले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!