🕒 1 min read
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रीय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा भाग काही दिवसापुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मागील दोन पर्वाप्रमाणेच तिसऱ्या मालीकेतील गुढ कथानक प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास मालिकेच्या निर्मात्यांना वाटत आहे. दरम्यान सगळीकडे आण्णा नाईक परत येणार या प्रोमोने चांगलाच धुमाकूळ घातला होता. मात्र यादरम्यान मालिकेच्या चाहत्यांना एकच प्रश्न सतावत होता.
मालिकेतील शेवंता ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये परत येणार का हा प्रश्न सर्व चाहत्यांना सतावत होता. या मालिकेतील आण्णा नाईक पाठोपाठ लोकप्रीय कोणते पात्र असेल तर ते शेवंताचे पात्र होते. मात्र शेवंता परत येणार का या प्रश्नाचे उत्तर हे पात्र साकारत असलेली अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने शेवंताचा लाल साडीतील प्रोमो प्रदर्शीत झाला आहे. झी मराठीने हा प्रोमो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये तिला पाहून फक्त काळजाचा ठोका चुकणार नाही तर थांबेल कायमचा… येतेय ‘शेवंता’…’ असे लिहीले आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1424424191500165128
‘जरा धीर म्हणून नाही तुम्हाला, सारखं आपलं कुठे गेली? कुठे गेली? कुठे जाणार? तुम्ही बोलावलं आणि मी येणार नाही. असं कधी होईल का. आलेच फक्त नजरेला नजर देऊ नका. आजपर्यंत घायळ केलं. यावेळी जिवचं घेईन.’ असा संवाद शेवंताच्या तोंडुन ऐकालया मिळतो. येत्या १६ ऑगस्टपासुन ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका रात्री ११ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेवंताच्या या प्रोमोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आमची मोर्चेबांधणी आणि तटबंदी काय असते याची भाजपला चांगली कल्पना – संजय राऊत
- आता केवळ एका मिस्ड कॉलद्वारे करता येणार गॅस सिलेंडरचे बुकिंग
- … तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली ? राष्ट्रवादीचा भाजपला थेट सवाल
- टी-२० विश्वचषकासाठी न्युझीलंडच्या संघाची घोषणा; ‘हा’ अनुभवी खेळाडू संघाबाहेर
- मेडल मोदी जी जीतकर लाये है क्या? कॉंग्रेस नेत्याने व्यक्त केली नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
