टीम महाराष्ट्र देशा – ५ वर्षात एकही विद्यार्थी पीएचडीकरता न आलेल्या ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला’ संशोधन संस्थेचा दर्जा पुन्हा देऊ नये अशी मागणी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. लोकसत्ता या वृत्तपत्राने दिलेली बातमी त्यांनी आपल्या ट्वीटरवर शेअर केली आहे.
२०१५ साली तत्कालीन भाजप शिवसेना सरकारने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला एम.ए. आणि पी.एच.डी. करू इच्छिणार्यांसाठी २० जागा दिल्या होत्या. परंतु या पाच वर्षात संस्थेकडे एकही विद्यार्थी आला नाही. आता संस्थेला पुन्हा पाच वर्षासाठी अशी परवानगी देऊ नये अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
आपल्या ट्वीट मध्ये सावंत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली आहे. ते म्हणले, ‘ संशोधन शब्द संघाला आवडत नाही.डोकं बाजूला ठेवावे ही स्वयंसेवकांकडून अपेक्षा! यांचे संशोधन विद्वेषाचे नवीन मार्ग शोधण्यात असते. स्वयंसेवक वैचारिक संशोधन करतील त्यादिवशी संघाचा त्याग करतील.५ वर्षे एकही विद्यार्थी पीएचडीकरता आला नाही. या संस्थेला संशोधन संस्थेचा दर्जा पुन्हा देऊ नये.’
संशोधन शब्द संघाला आवडत नाही.डोकं बाजूला ठेवावे ही स्वयंसेवकांकडून अपेक्षा! यांचे संशोधन विद्वेषाचे नवीन मार्ग शोधण्यात असते. स्वयंसेवक वैचारिक संशोधन करतील त्यादिवशी संघाचा त्याग करतील.५ वर्षे एकही विद्यार्थी पीएचडीकरता आला नाही. या संस्थेला संशोधन संस्थेचा दर्जा पुन्हा देऊ नये. pic.twitter.com/I10oZpAXHw
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 13, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

