Share

ईमानदार अधिकाऱ्यावर खालच्या पातळीवर टीका करु नका – सदाभाऊ खोत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सध्या चर्चेत आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबावर ते विविध आरोप करतांना दिसतात त्यामुळे राजकीय वर्तुळात या संबंधी चर्चा सुरु असते. मलिक यांनी समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकल्याशिवाय शांत राहणार नाही असा धमकी वजा इशारा दिला होता.

परंतु विधान परिषद सदस्य आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे त्यात त्यांनी म्हंटले आहे की ‘नबाब मलिक,तुमचा प्रॉब्लेम नक्की काय आहे? जावयाकडे मुद्देमाल सापडूनही तुम्ही त्याला इनोसंट म्हणताय? तुमचा जावई म्हणून त्याची बाजू जरुर घ्या पण एका ईमानदार, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर खालच्या पातळीवर टीका करु नका. नाहीतर सरकारी कामात अडथळा आणलात तर तुम्हाला सुद्धा जावया शेजारी बसवतील’ असा खोचक टोला सदाभाऊ यांनी लगावला आहे.

दरम्यान नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्या प्रकरणावर राज्यातील अनेक नेते दावे-प्रतिदावे,आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहे. त्यामुळे आता पाहावे लागेल की नवाब मलिक सदाभाऊंच्या ट्वीटचे उत्तर कशा प्रकारे देतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!