Share

प्रसिध्द गायिका लता दीदींच्या प्रकृतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका-निर्मात्या अनुषा श्रीनिवासन

Published On: 

मुंबई : प्रसिध्द गायिका लता मंगेशकर (Latta Mangeshkar) सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहेत. त्या कोविड -19 (covid-19) मधून बरे झाल्या आहेत. तरीदेखील त्याच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (brich candy) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्याबद्दल पसरत असलेल्या खोट्या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेऊ नका, असे आवाहन एका पोस्टद्वारे चित्रपट निर्मात्या आणि लेखक अनुषा श्रीनिवासन अय्यर (Anusha shinivasan iyer) यांनी केली आहे.

दरम्यान लता मंगेशकर यांना ९ जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या सध्या आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत. मात्र काही समाजकंटकांनी खोट्या बातम्या पसरवल्या आहेत, अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. त्या लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा, असं एका पोस्टद्वारे निर्मात्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी चाहत्यांना सांगितलं आहे. त्यांची पोस्ट पाहून चाहत्यांनी लाईक कमेंट करत आहेत.

 

दीदींच्या प्रकृतीत सुधारणा

सध्या लत्ता दीदींचं वय ९२वर्षे आहे, त्यांची तब्येत सुधारणी असून त्यांनी पोषक आहार खाण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांच्यात चांगली सुधारणा दिसून येत आहे. तसेच त्या व्हेंटिलेटरवर नाहीत. डॉ प्रतित समदानी आणि इतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोविड आणि न्यूमोनियाच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेव्हापासून लता मंगेशकर यांच्या आरोग्याचे अपडेट्स रुग्णालयातील डॉक्टर जारी करत आहेत. मंगेशकर कुटुंबीयांकडून लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबतचे अपडेट्स दिले जात आहेत. त्यांची ‘लताजींची प्रकृती आता ठीक आहे. डॉक्टर बोलतील तेव्हा त्यांना घरी आणले जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!