मुंबईः राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे जोरदार राजकारण आपल्याला पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडणार असा दावा भाजप नेते सातत्याने करत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहेत. “राज्यात भाजपला पुन्हा येऊ देणार नाही”, असे बोलत जोरदार गर्जना शरद पवारांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी गुरुवारी भेट घेतली. भाजपला राज्यात येऊन देणार नाही, पण त्यांच्याकडूनही काही शिका, असा सल्ला शरद पवारांनी तरुण आमदारांना दिला. महाविकास आघाडीचे तरुण आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक, ऋतुराज पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. याठिकाणी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही – शरद पवार
पवार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची सिल्वर ओकवर बैठक झाली. ही बैठक जवळपास दोन तास चालली. बैठक संपून आमदार निघण्याच्या तयारीत असताना शरद पवार उभे राहिले. ‘त्यांनी आपले दोन्ही हात वर करीत आणि वज्रमूठ तयार करून, घाबरायचे काही कारण नाही. मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही, असा आत्मविश्वास व्यक्त केला’. व म्हणाले, भाजप आपला राजकीय प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्या अनेक नकारात्मक गोष्टी असल्या, तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत. असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या –


