🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेची विजयानं सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं २२८ धावांचं आव्हान भारताने ६ गडी राखून गाठलं. आफ्रिकेचा वर्ल्डकप स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव ठरला.

दक्षिण आफ्रिकेनं प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम गोलंदाजी करताना, धोनीच्या एका कृतीमुळं चाहते त्याच्यावर चांगलेच खुश झाले आहेत. यष्टीरक्षण करताना धोनीच्या ग्लोव्ह्जवर एक खास चिन्ह दिसून आले. हे चिन्ह होते, पैरा स्पेशल फोर्स या चिन्हाला बलिदान चिन्ह असंही म्हटले जाते. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धोनीची भारतीय सैन्यदलाप्रती असणारी धोनीची ओढ कोणापासूनही लपलेली नाही. देशसंरक्षणासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचा त्याला अपरंपार अभिमान आहे. आपला देश आणि सैन्याविषयी असणारी हीच आदराची भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून त्याने ‘बलिदान’ हे चिन्हं असणारे ग्लोव्ह्ज घातले होते. सोशल मीडियावर त्याच्या हातातील ते हँडग्लोव्ह्ज लगेचच लक्ष वेधून गेले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
