🕒 1 min read
मुंबई : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित झाली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अखेर उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. बीडच्या रजनीताई पाटील यांच्या नावावर हायकमांडने मोहोर लावली आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी अन् राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू आणि जम्मू काश्मीर च्या प्रभारी असणाऱ्या रजनीताई पाटील यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी देखील सुचविण्यात आले होते. मात्र, राज्यपालांनी अद्याप या यादीला मंजुरी दिलेली नाही. त्यानंतर सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसने रजनीताई यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
याआधी काँग्रेसकडून मुकूल वासनिक, प्रज्ञा सातव, मिलिंद देवरा, राजीव शुक्ला यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अखेरील रजनी पाटील यांची निवड झाली आहे. मात्र, पाटील यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केलं आहे. तसे पत्रकच काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश येथील रिक्त जागांचा समावेश आहे. एकूण सहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. तर मध्यप्रदेशातील एका जागेचा, पश्चिम बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील दोन रिक्त जागांचा समावेश आहे .४ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच दिवशी निकाल सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
