🕒 1 min read
नवी दिल्ली : हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीला भारताने मान्यता दिल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वर बदलले आहेत. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. भारतीयांनी आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीला मान्यता दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
ट्रम्प म्हणाले, ‘असाधारण परिस्थितीत मित्रांमध्ये घनिष्ठ सहकार्य आवश्यक असते. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्णय घेण्याबद्दल भारत आणि भारतीय लोकांचे आभार. तो विसरला जाणार नाही!
Extraordinary times require even closer cooperation between friends. Thank you India and the Indian people for the decision on HCQ. Will not be forgotten! Thank you Prime Minister @NarendraModi for your strong leadership in helping not just India, but humanity, in this fight!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 8, 2020
पुढे ट्रम्प म्हणतात, ‘या लढाईत केवळ भारतच नाही तर मानवतेलाही मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी घेतलेल्या दृढ नेतृत्वाबद्दल पंतप्रधानांचे आभार. तसेच ट्रम्प यांनी मोदींच्या भक्कम नेतृत्त्वाचे आणि भारतीय लोकांचे आभार मानले असून ते मानवतेला मदत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकन न्यूज चॅनल फॉक्स न्यूजशी झालेल्या संभाषणादरम्यान ट्रम्प म्हणाले- हायड्रोक्सीक्लोरोक्वाइनच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी आम्हाला मदत केली आहे, ते खूप चांगले आहेत. पुढे ट्रम्प म्हणाले की, आम्हाला परदेशातून बरीच औषधे दिली जात आहेत. त्यात भारतात तयार केलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधे देखील आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
