🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज ७५ वा दिवस आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनाचं सिंधू बॉर्डरवर असलेलेलं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. या ठिकाणाहून अखिल भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
शेतकरी आंदोलनाची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात येत असून पॉप स्टार रिहाना व पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. मात्र या दोन्ही सेलिब्रिटींनी मांडलेल्या भूमिकेनंतर भारतीय क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी ‘भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ करू नये’ अशी एकमुखी भूमिका मांडली.
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील अशीच भूमिका मांडली होती. मात्र यानंतर सचिनला सोशल मीडियावर मोठा विरोध करण्यात येतोय. शेतकरी आंदोलनाबाबत इतक्या दिवसांपासून शांत बसलेला सचिन रिहाना व ग्रेटाच्या ट्विटनंतर जागा झाल्याने नेटकरी चांगलेच भडकलेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनला मोलाचा सल्ला दिला आहे. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्र पणे होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील. अस पवार म्हणाले आहेत.
यावर आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. ‘सचिन तेंडुलकरने क्रिकेट सोडून दुसऱ्या विषयावर बोलू नये पण पवार ब्रम्हांड ज्ञानी असल्यामुळे इतिहासाबद्दल पण बोलणार. किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी’? असा घणाघात भातखळकर यांनी केला आह्रे.
सचिन तेंडुलकरने क्रिकेट सोडून दुसऱ्या विषयावर बोलू नये पण पवार ब्रम्हांड ज्ञानी असल्यामुळे इतिहासाबद्दल पण बोलणार. किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी??? @PawarSpeaks @sachin_rt pic.twitter.com/9aBn02Wn5L
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 7, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘रूट को जड़ से उखाड़ देंगे ! अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला अँड्य्रू फ्लिंटॉफने दिले भन्नाट उत्तर !
- परळी शहरात दहा लाखांची चोरी; काही दिवस आधिच आयजींकडून झाला आढावा
- ‘देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय’
- विजय हजारे ट्रॉफीला येत्या २० फेब्रुवारीपासून होणार सुरुवात
- आरटीओंची धडक मोहीम; खासगी बसेसवर केली कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
